spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘VBYLD-2027’ क्विझमध्ये जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे 

– जिल्हा युवा अधिकारी सुशील भड यांचे आवाहन

– ‘विकसित भारत @2047’च्या संकल्पनेसाठी उपक्रम; ३० सप्टेंबरपर्यंत सहभागाची संधी

हंसराज, भंडारा :- युवा कार्य विभाग, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने ‘विकसित  भारत यंग लीडर्स डायलॉग’ (VBYLD) 2027 या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. देशातील युवकांना नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देणे तसेच ‘विकसित भारत @2047’ या संकल्पनेच्या दिशेने युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत ‘VBYLD-2027 क्विझ’ आयोजित करण्यात आली असून, भंडारा जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या क्विझमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मेरा युवा भारत, भंडाराचे जिल्हा युवा अधिकारी सुशील भड यांनी केले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील युवकांना राष्ट्रीय विकास, नेतृत्व, नवकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीशी संबंधित विषयांमध्ये सहभागी होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. युवकांनी यामध्ये सहभागी होऊन आपल्या ज्ञान व क्षमता-विकासाची संधी साधावी, असे सांगण्यात आले आहे.

क्विझचे स्वरूप :

‘MY Bharat’ पोर्टलवरील माहितीनुसार VBYLD-2027 क्विझमध्ये एकूण २० प्रश्न विचारले जाणार असून, ते सोडवण्यासाठी १० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. प्रत्येक सहभागीला ही क्विझ सोडवण्यासाठी केवळ एकच संधी (प्रयत्न) मिळणार आहे.

असा नोंदवा सहभाग :

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत आहे. इच्छुक युवकांनी MY Bharat पोर्टलवर लॉगिन करून ‘Quiz & Challenges’ या विभागात जावे. तेथे ‘Viksit Bharat Young Leaders Dialogue (VBYLD) 2027 Quiz’ पर्याय निवडून दिलेल्या सूचनांनुसार सहभाग नोंदवावा.

जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, NSS, NCC, Scout & Guide, युवा मंडळे, क्रीडा मंडळे व विविध युवा संघटनांशी संबंधित युवकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. तसेच सर्व संबंधित शैक्षणिक संस्था व युवा संघटनांनी आपल्या स्तरावर युवकांना माहिती देऊन जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी सुशील भड यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.