spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बुटीबोरी येथे काँग्रेसचा भव्य सत्कार सोहळा आणि आढावा बैठक

नागपूर ११ :– नागपूर तालुका (ग्रा) काँग्रेस कमिटी आणि बुटीबोरी शहर काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि १० ऑगस्टला बुटीबोरी येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ता आढावा बैठक आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा साईकृपा मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी मंत्री सुनील केदार,तर प्रमुख अथिती म्हणून रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष अश्विन बैस,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, महासचिव कुंदा राऊत, महाराष्ट्र काँग्रेस कमटी, सचिव डॉ रमण चौधरी,बुटीबोरीचे काँग्रेसचे  राजू गावंडे, आशिष वरघणे, सुधाकर कैकाडी, सुधीर भाऊ देवतळे, अमजद भाई शेख, संजू भुमरकर आणि नागपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय चिकटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटनात्मक बांधणी, ग्रामीण भागातील विकासाचे प्रश्न आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुकांची पूर्वतयारी यावर भर दिला. बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये संघटनेची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. प्रीती चौधरी यांनी केले.या प्रसंगी बुटीबोरी आणि परिसरातील मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.