नागपूर :- टीएम्स अकॅडमी अँड ब्युटी प्लेस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड कराओके सिंगिंग स्पर्धा सीझन-१० चे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. आयोजक सुश्री तेजश्री उपाध्याय यांच्या संकल्पनेतून झालेल्या या स्पर्धेला संगीतप्रेमी आणि स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय गायिका व परफॉर्मर स्नेहा उमरेडकर यांची विशेष उपस्थिती लाभली. स्पर्धेचे परीक्षण जगदीश दलवी व पूनम गावंडे यांनी केले. कार्यक्रमाला अतिथी म्हणून अनिल धकाते व डॉ. रश्मी तिरपुडे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. स्पर्धेत अभिजीत पात्रा यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत विजेतेपद पटकावले. प्रांजलि तेलंग यांनी प्रथम उपविजेतेपद, तर समीर अंडेर सहारे यांनी द्वितीय उपविजेतेपद मिळविले.
आयोजक तेजश्री उपाध्याय यांनी सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रतिभावान गायकांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. टीएम्स अकॅडमी अँड ब्युटी प्लेसच्या संगीत क्षेत्रातील या उपक्रमाला सीझन-१० मध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.





