– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द
– सामाजिक उपक्रमातून मंडळाची नवी वाटचाल
नागपूर :- विवेकानंद नगर गणेशा उत्सव सांस्कृतिक सेवा ट्रस्ट च्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख १ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमातून ही मदत देण्यात आली. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील प्रसिद्ध डिजीटेलंड येथे भेटीसाठी आले असता, भेटी दरम्यान मंडळाचे अध्यक्ष महेश भिंगारे यांनी मंडळा च्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख १ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अशा प्रकारचे योगदान देण्याची ही पहिलीच वेळ असून, या उपक्रमातून मंडळाने सामाजिक कार्याची नवी वाटचाल सुरू केली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करून आगामी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका वर्षा चौधरी, दक्षिण- पश्चिम मंडळाचे अध्यक्ष विनोद शिंदे, गजानन निषिदकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अर्थव भिंगारे, आर्यन एकबोटे, प्रणय हाडके, अक्षय लकुडकर, अनर्व गाडेकर, दुबे, हाडके तसेच विवेकानंद नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





