spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उमरेडच्या पाचगाव आश्रमशाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरा

उमरेड ११ : उमरेड तालुक्यातील पाचगाव येथील नवीन देसाई निवासी उच्च प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळेत अनाथ, शेतकरी आणि खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या मुला-मुलींनी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

यावेळी आश्रमशाळेतील मुलींनी मुलांच्या मनगटावर राख्या बांधल्या, औक्षण केले आणि एकमेकांना खाऊ तसेच भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. हा सोहळा अत्यंत भावनिक आणि आनंददायी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमासाठी ए.के. खानोरकर शोरूमच्या संचालिका पूजा खानोरकर, अनिकेत खानोरकर, मुख्याध्यापक गोपाल मसराम यांच्यासह शोभा ठाकरे, हेमा तुपकर, सरीता मेश्राम, पुष्पा कुंभरे, सुप्रिया मसराम, तुलाराम कुंभरे आणि क्षितिज खानोरकर उपस्थित होते.

यावेळी मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते आणि शाळेला भेटवस्तूही देण्यात आल्या. विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने बोलताना मुख्याध्यापक गोपाल मसराम यांनी विद्यार्थ्यांना परिश्रम, धैर्य आणि प्रामाणिकपणे शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन केले. यापुढेही मदतीचा हात कायम राहील, असा विश्वास अनिकेत खानोरकर यांनी व्यक्त केला.

कल्याणी धरणे, कोमल पोंगडे, वंदना गिरीपूंजे, जागृती शिंदे, अरुण भिसीकर, गौरव नंदनवार, अंकित मोहीनकर, दिपेश पटेल आणि प्रणय हरडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Popular Articles