spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर लेबर युनियन द्वारे मजुरांचा सन्मान

– 100 सायकल व 100 शिलाई मशीन चे करण्यात आले वाटप

राष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर लेबर युनियन द्वारे विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून मजुरांना १०० सायकली आणि १०० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. पवार विद्यार्थी भवन येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गोवा आणि इतर राज्यांमधून मजूर व ठेकेदार बंधू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. असंगठीत कामगारांच्या कल्याणासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर लेबर युनियन तर्फे घेण्यात आलेल्या या मदत साहित्य वाटप कार्यक्रमामुळे अनेक गरजूंना मदतीचा हात मिळाला.

या कार्यक्रमात नागपूर चे राजे  मुधोजी भोसले महाराज तथा दिपक निलावार मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाले होते. असंगठीत कामगार हे देशाच्या विकासात मोठ्या प्रमाणावर योगदान असून सुद्धा ते नेहमी दुर्लक्षित असल्याची खंत राजे मुधोजी भोसले यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली. दीपक निलावार यांनी मजुरांच्या विकासासाठी लोकांनी समोर येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात युनियनचे अध्यक्ष विजय पटले यांनी मजुरांच्या विविध विषयांवर प्रकाश टाकला तसेच गेल्या 4 वर्षात 1 मजुरांच्या 1500 केसेस मध्ये मजुरांना न्याय दिल्याची माहिती दिली. याप्रसंगी मजुर व ठेकेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.