नागपूर :- महात्मा जोतिराव फुले जयंती द्विशताब्दी वर्षानिमित्य रेशीमबाग येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेत 24 सप्टेंबर 2026 ला सत्यशोधक समाज वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
मानवता हाच खरा धर्म,सत्याने वर्तावा जोती म्हणे, असें सांगणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या पुतळ्यांना संस्थेचे आजीवन सदस्य प्रभाकर येवले व संचालिका शोभा लेकुरवाळे यांनी माल्यार्पण करून उपस्थितीतांनी मानवंदना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान संस्थेचे अध्यक्ष, प्रा. अरुण पवार यांनी भूषविले तर प्रमुख वक्ता म्हणून शैल जेमिनी यांची उपस्थिती लाभली.यावेळी प्रमुख वक्ता म्हणून बोलतांना महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज स्थापनेमागील भूमिका स्पस्ट केली, महात्मा फुलेचे सामाजिक कार्य, विचार प्रणाली मांडली. अध्यक्षीय भाषणात प्रा. अरुण पवार यांनी महात्मा फुले जयंती द्विशताब्दी वर्षानिमित्य संस्थेद्वारे वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येतं आहे याबद्दल माहिती दिली, तसेंच जयंती द्विशताब्दी वर्षांमध्ये अनेक कार्यक्रम गावोगावी, शहरात उत्साहात साजरा करावा यासाठी मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर स्वलिखित “प्रबुब्ध भारत “वृतपत्राचा प्रती संस्थेतर्फे बहुजन समाजात वाटप करण्याचा मानस व्यक्त केला.यावेळी ज्ञानेश्वर रक्षक, बाबा बिडकर व उमेश कोराम यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन संस्थेचे संचालक प्रा.डॉ.अभिजित पोतले तर आभार संचालक राजेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश देवते,उपाध्यक्ष गुलाब चिचाटे, सरचिटणीस रवींद्र अंबाडकर, सह चिटणीस रमेश राऊत, संचालक सुनील चिमोटे,नंदू कण्हेर, प्रा पंकज कुरळकर, देवेंद्र काटे संचालिका अलका झाडे व मोठया प्रमाणात समाज बांधव-भगिनी उपस्थित होते.




