नागपूर :- ज्याअर्थी म.न.पा., हनुमान नगर झोन क्र. 03 या क्षेत्रिय कार्यालयाच्या नियंत्रणातील कर निर्धारण वार्ड क्र. 76 मौजा हुडकेश्वर (बु.) या परिसरातील खालील मिळकतीवरील मालमत्ता कर थकबाकी कर वसूल करण्याकरिता महाराष्ट” महानगरपालिका अधिनियमाचे प्रकरण 8 नियम 39, 40 नुसार मौक्यावरील सुचना फलकावर मालमत्ता कर देयके चष्मा करुन दिनांक .22/09/2026 रोजी जाहीर प्रसिध्द करण्यात आले आहे.
ज्याअर्थी सदर मिळकतीचे मिळकतदार / सोसायटी मालक यांस सुचित करण्यात येते की, वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापासून 15 दिवसाचे आत मालमत्ता कराचा भरणा या कार्यालयास करावा अन्यथा महाराष्ट” महानगरपालिका अधिनियम 1949 च्या अनुसूची प्रकरण 8 च्या नियम 45 पोटनियम (1) व (2) तसेच मनपा स्थायी आदेशातील तरतुदी अन्वये स्थावर / जंगम मालमत्तेचा ताबा घेवून मालमत्ता जप्त करुन मालमत्ता विक्रीची कार्यवाही करण्यात येईल, याची संबंधीत मिळकतदारांनी नोंद घ्यावी.



