थर्ड पार्टी डॅमेजमुळे २८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

0
4

नागपूर :- २८-०९-२०२६ रोजी दुपारी प्रजापती चौकाजवळ, ‘पारडी फिडर’च्या ७०० मिमी व्यासाच्या वाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह एका थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टरकडून झालेल्या कामामुळे खराब झाला. त्यानंतर, दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी तातडीने बिघाड निवारणाचे काम (इमर्जन्सी ब्रेकडाऊन) सुरू करण्यात आले.

परिणामी, खालील ‘सीए’ (CA) क्षेत्रांमधील आज सायंकाळच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल:

१. सुभान नगर ईएसआर (ESR) सीए – साई नगर, नेताजी नगर, म्हाडा कॉलनी, विजय नगर, निवृत्ती नगर, भारत नगर, लक्ष्मी नगर, गुलमोहर नगर, भगत नगर, महादेव नगर, भारतवाडा, दुर्गा नगर. गुजराती कॉलनी, चंद्र नगर, जुनी पारडी, एचबी टाऊन, आभा कॉलनी, शिक्षक कॉलनी, ओम नगर, तलमले नगर

2. मिनीमाता ईएसआर सीए – मिनीमाता नगर, जानकी नगर, पंच झोपडा, जलाराम नगर, सूर्या नगर, एसआरए योजना, जनता कॉलनी, चिखली लेआउट औद्योगिक क्षेत्र

3. भांडेवाडी ईएसआर सीए – पवनशक्ती नगर, अब्बुमिया नगर, तुलसी नगर, अंतुजी नगर, मेहर नगर, साहिल नगर, सरजू टाऊन कहांडवानी टाऊन, वैष्णोदेवी नगर, श्रवण नगर, महेश नगर, सूरज नगर

4. पारडी ESR 1 CA – महाजन पुरा, खाटीक पुरा, कोष्टी पुरा, दीप नगर, शेंडे नगर, आंबे नगर, विनोबा भावे नगर, BH दुर्गा नगर, गोंड मोहल्ला, उडिया मोहल्ला, गजानन मंदिर परिसर, हनुमान नगर, ठवकर वाडी, साडणी नगर

5. पारडी ईएसआर 2 सीए – अशोक नगर, मोरकर वाडी, सुभाष मैदान, ता.पुरा, शारदा चौक, गंगाबाग, दत्त चौक, भवानी नगर, घटाटे नगर, राम मंदिर परिसर, शिव नगर, आभा नगर, नवीन नगर, श्याम नगर, दुर्गापूर, भक्तनगर, भक्तनगर बस्ती, भोलेश्वर सोसायटी, रेणुका नगर

बंद कालावधीत बाधित भागातील नागरिकांनी सहकार्य करावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा किंवा बिल भरण्याबाबत अधिक माहितीसाठी किंवा सहाय्यासाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइनवर 1800 266 9899, ईमेल contact@ocwindia.com वर संपर्क साधू शकतात किंवा प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून नागपूर जल ग्रहक सेवा ॲप डाउनलोड करू शकतात.