किशोर साहू, मौदा :- कोदामेंढी बसस्थानकावरील अतिक्रमणाबाबत चर्चा व आठवडी बाजार सीमांकन करणे या दोन विषयावर सोमवार (ता.28 सप्टेंबर) ला कोदामेंढीच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासातील ग्रामपंचायत कार्यालय ऐवजी बसस्थानकात सायं.6 वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. कोरम अभावी विशेष ग्रामसभा तहकूब होत नाही. मात्र पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून जिल्ह्यात आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहितेमुळे ही ऐतिहासिक ग्रामसभा तहकुब झाली असून, आचारसंहिता संपल्यानंतर ही विशेष ग्रामसभा बस स्थानक चौकातच होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरील आपल्या स्टेटसवर ठेवली आहे. आचारसंहिता सुरू असताना विशेष ग्रामसभेचे पत्र ग्रामपंचायत ने का काढले? अपर तहसील कार्यालय मंजूर झालेल्या कोदामेंढी येथे आचारसंहितेचे भंग होत असेल तर तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीतही असा प्रकार तर सुरू नाही ना? असा सवाल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित प्रशासन विभागासमोर मांडला आहे.
Home Latest News कोदामेंढीच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासातील ग्रामपंचायत कार्यालय ऐवजी बस स्थानकात कोरम अभावी तहकूब न...



