– ग्रामपंचायत चाचेरच्या यशस्वी प्रयत्नांना यश; शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना होणार मोठा फायदा
किशोर साहू, मौदा :- ग्रामपंचायत चाचेरच्या ठराव पत्रानुसार (ठराव क्र. १६/१० दि. ०५/०२/२०२६) मंजूर झालेल्या दोन महत्वाच्या रस्त्यांच्या कामाबाबत नुकतीच प्रशासनाकडून सविस्तर पाहणी व चौकशी करण्यात आली.
बाजार चौक लक्ष्मीनारायण मंदिर ते हनुमान नगर सिमेंट रस्ता: हा रस्ता ५.५ मीटर रुंदीचा असून दोन्ही बाजूला १-१ मीटर नाली बांधकामासह मंजूर झाला आहे.तसेच चाचेर ते नेरला पांदण रस्ता: या शेतरस्त्याचे सिमेंटिकरण करण्याबाबत सुद्धा पाहणी व चौकशी करण्यात आली.
या दोन्ही कामांची सुरुवात लवकरच होणार असून, हे रस्ते झाल्यानंतर शेतकरी वर्गाला शेतात जाणे-येणे सोपे होईल, शाळेतील मुलांना चिखलातून जावे लागणार नाही आणि सर्व नागरिकांसाठी दळणवळण सोयीचे होईल.

ग्रामपंचायतच्या प्रयत्नाने हे दोन्ही रस्ते मंजूर झाले आहेत.यापूर्वी दि. २७/०६/२०२६ रोजी सरपंच लुंबिनी कलारे यांनी महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे याबाबत प्रस्ताव सादर केला होता, त्यानुसार दि. ३१/०८/२०२६ रोजी MMGSY अंतर्गत अधिकाऱ्यांनी गावात येऊन ट्रांजिट वॉक केला होता, हे विशेष!
या प्रसंगी सरपंच लुंबिनी महेश कलारे, गंगाधर बादुले, कृष्णा टीकले, ग्रामपंचायत सदस्य शैलेश कोपरकर, माजी सरपंच महेश कलारे,माजी उपसरपंच प्रकाश वाकलपुडी, सुरेंद्र टेंभरे, योगेश निनावे, चंद्रकला धोटे, सुमन सोमकुवर, सविता जांभरे, नलू दरवई, रोशनी किरपान, ममता चौरे, स्नेहा पायतोडे, भाजपा किसान आघाडी जिल्हा ( रामटेक ) ग्रामीण मंत्री विनोद कोपरकर, अशोक बावनकुळे, ज्ञानेश्वर नाकाडे, प्रकाश काळे, अशोक गडे, नरेश बादुले, दिलीप गडे, पुरुषोत्तम आंबीलढुके,मारुती साखरवाडे, गेंदलाल मोहने, उत्तम पाटील, देवा अढाऊ, मोरेश्वर किरपान, चिंटू सोमनाथे, लीलाधर दरवई, शुभम गडे व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
लवकरच या कामाची प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.








