किशोर साहू, मौदा :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा से संकल्प अभियान’ अंतर्गत राधा मुकेश अग्रवाल यांच्या पुढाकाराने खात – रेवराल जि प क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या घोटमुंढरी, ढोलमारा, आष्टी, महालगाव, देवमुंढरी आणि खात येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देण्यात आली.
यावेळी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अंगणवाडी केंद्रातील विविध उपक्रमांची पाहणी करून सेविका व मदतनीसांशी संवाद साधण्यात आला.
तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींशी संवाद साधून योजनांच्या माध्यमातून मिळालेल्या लाभाबाबत त्यांचे अनुभव जाणून घेण्यात आले.
या उपक्रमाला शुभांगी मेंढे समाजसेविका तथा प्रभारी नागपूर जिल्हा भाजपा महिला आघाडी, प्रीती मानमोडे अध्यक्ष महिला आघाडी नागपूर जिल्हा, निशा सावरकर माजी अध्यक्ष जि.प. नागपूर, राधा अग्रवाल माजी सदस्य जि.प. नागपूर, डॉ. नीलिमा घाटोळे महामंत्री जिल्हा महिला आघाडी भाजपा, कांचन दंढारे भाजपा तालुकाध्यक्ष महिला आघाडी मौदा यांची उपस्थिती होती.
यावेळी संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध योजनांचे लाभार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.



