– LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला
मुंबई :- नवा महिना सुरू झाला आणि सर्वसामान्यांना पहिल्याच दिवशी मोठा झटका बसला. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवसाच्या सकाळीच महागाईची फोडणी बसलीय. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 1 ऑक्टोबर 2026 च्या सकाळी एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये बदल केले असून नव्या किंमती जारी केल्या आहेत. नवरात्रौत्सवाच्या काही दिवसांवरच आला असताना हा महागाईचा झटका अनेकांचं बजेट कोलमडवणारा ठरतोय. दरम्यान, तेल कंपन्यांनी 19 किलोंच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ केली असून तब्बल 62.50 रुपयांनी दर वाढवले आहेत. तर, घरगुती सिलेंजर्सच्या किंमती मात्र, स्थिर ठेवण्यात आल्यात.
1 ऑक्टोबर 2026 पासून ऑईल मार्केटिंग कंपन्यांद्वारे वाढवण्यात आलेले कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतींवर नजर टाकली, तर राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोंचा सिलेंडरचे दर 62.50 रुपयांनी वाढून आता 2 हजार 810 रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान, याआधी गेल्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला 19Kg LPG Cylinder Price मध्ये वाढ करण्यात आलेली आणि दिल्लीमध्ये सिलेंडर 9.50 रुपयांनी महाग झालेला. आता सणासुदीच्या काळात एलपीजी सिलेंडरच्या महागाईटा झटका अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. एलपीजी सिलेंडरच्या महागाईचा झटका थेट हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि कॅटरिंग व्यवसायांना बसला आहे.
घरगुती सिलेंडर्सचे दर स्थिर
एकीकडे तेल कंपन्यांनी 19 किलोंच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडर्सच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. यादरम्यान, काहीशी दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, 14.2 किलोंचा एलपीजी सिलेंडर जुन्याच दरांमध्ये मिळतोय.








