spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वर्ध्यात युवतीवर अत्याचार, ४३ लाखांचे व्यवहार

वर्धा :- वर्धा शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका २३ वर्षीय तरुणाने लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार अत्याचार केला आहे. या अत्याचारातून पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेच्या आक्षेपार्ह फोटोंचा वापर करून तिला ब्लॅकमेल करत पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय आरोपीनं पीडितेच्या नावाने बँक खातं उघडून त्यातून सुमारे ४३ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याचं देखील समोर आलं आहे. आरोपी हा पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून, या घटनेमुळे वर्धा जिल्हा आणि पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावरील मैत्रीतून जाळ्यात ओढलं

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी वर्ध्यात भाड्याच्या खोलीत राहते. ऑक्टोबर २०२५ मध्ये तिची सोशल मीडियाद्वारे वर्ध्यातील गजानन नगर येथील वेदांत रत्नाकर पांडे (वय २३) याच्याशी ओळख झाली होती. आरोपीनं आपण अनाथ आहे. रत्नाकर पांडे यांनी आपल्याला दत्तक घेतलं आहे, असा बनाव रचला. तसेच आरोपीनं पीडितेला बँक खातं काढायला लावत, त्याचा अॅक्सेस आपल्याकडे घेतला.

पुढे वेदांतने तिच्याशी जवळीक वाढवून लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर अत्याचार केले. पण अलीकडेच पीडित तरुणीला बँकेकडून नोटीस पाठवण्यात आली. तिच्या बँक खात्यावर ४३ लाखांचे व्यवहार झाल्याची माहिती बँकेनं दिली. तसेच त्या व्यवहाराबाबत माहिती विचारली. पण तिला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे तिला संशय आल्यानंतर तिने वेदांतला आपल्या बँक खात्यावरील गैरव्यवहार थांबवण्यास सांगितलं.

१५ फेब्रुवारी रोजी पीडित तरुणी वैष्णवी कॉम्प्लेक्सजवळील आरोपीच्या एका मित्राच्या खोलीवर गेली होती. तिथे तिने बँक खात्यावर सुरू असलेला अवैध व्यवहार बंद करण्याबाबत वेदांतकडे विचारणा केली, तेव्हा आरोपीने पुन्हा तिच्यावर बळजबरी केली. या दरम्यान तरुणी गरोदर राहिल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खायला घालून तिचा गर्भपात घडवून आणला. तसेच त्याने पीडितेचं पासबुक आणि एटीएम कार्ड हरवल्याचं बँकेत सांगण्यासाठी दबाव आणला आणि हे प्रकरण कुटुंबाला सांगितल्यास वडिलांना व भावाला ठार मारण्याची धमकी दिली.

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० हजार उकळले

आरोपीने पीडित तरुणीचे काही खाजगी फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिच्या भावाला आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तो सतत तिला ब्लॅकमेल करत होता. आरोपीने आतापर्यंत तिच्याकडून ५० हजार रुपये उकळले होते. २३ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीने पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने तिच्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला.

Popular Articles