spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर चित्र प्रदर्शन..

 

नागपूर १२ : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर येथे “पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर चित्र प्रदर्शन” भरवण्यात आले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या या केंद्रात ११ ते १५ ऑगस्ट २०२५ या काळात ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन ११ ऑगस्ट २०२५ रोजी सीपी डब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता  चंद्रकांत चांदेकर, संस्कार भारती, रायपूरचे अध्यक्ष  रिखी क्षत्रिय, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका  आस्था कार्लेकर आणि संस्कार भारती, रायपूरचे  हेमंत माऊलीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.

या प्रदर्शनात रायपूर, छत्तीसगड येथे १८ ते २० एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या चित्रकला कार्यशाळेतील चित्रे मांडण्यात आली आहेत. या चित्रमालेत लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या राजकारण, समाजकार्य, धार्मिक कार्य आणि न्याय यांसारख्या विविध पैलूंवर आधारित चित्रांचा समावेश आहे.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आणि लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातील विविध घटनांना चित्रांच्या माध्यमातून जाणून घेण्याचे आवाहन केले आहे.

Popular Articles