spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर -वर्धा जिल्हा स्थानीय लोकाधिकार सेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन 

– शिवसेना व स्थानीय लोकाधिकार सेनेची संयुक्त मागणी

– कंत्राटी शिक्षक भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना १०० टक्के प्राधान्य द्या 

नागपूर :- वर्धा जिल्हा स्थानीय लोकाधिकार सेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन : शिवसेना व स्थानीय लोकाधिकार सेनेची संयुक्त मागणी

नागपूर :- 

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या पदभरतीमध्ये नागपूर जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना १०० टक्के प्राधान्य देण्यात यावे, अशी ठाम मागणी नागपूर व वर्धा जिल्हा स्थानीय लोकाधिकार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना संयुक्तपणे निवेदन सादर करण्यात आले नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता लक्षात घेता कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची पदभरती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत स्थानिक युवक – युवतींना रोजगाराची संधी मिळणे आवश्यक असून, नागपूर शहर व जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना प्रथम प्राधान्य मिळावे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. स्थानिक भूमिपुत्र पात्र असताना बाहेरील उमेदवारांना संधी मिळू नये आणि स्थानिक बेरोजगारांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नागपूर – वर्धा जिल्हा स्थानीय लोकाधिकार सेनेचे अध्यक्ष राजा रामद्वार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सूरज गोजे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. मनपाच्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाने स्पष्ट धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या मर्यादित संधी उपलब्ध असताना स्थानिक पात्र उमेदवारांकडे दुर्लक्ष होणे योग्य नाही. नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये निर्माण होणाऱ्या शिक्षकांच्या तात्पुरत्या पदांवर स्थानिक पात्र उमेदवारांना संधी दिल्यास त्याचा लाभ शहरातील बेरोजगार युवक- युवतींना होऊ शकतो. त्यामुळे भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक अजयभाऊ दलाल, बलबीर पाटील, तसेच स्थानीय लोकाधिकार सेनेचे पदाधिकारी मोरू पंचबुधे, ज्ञानेश्वर माहुरे, विवेक पारधी, अशोक जवंजाळ, कैलास वावरे, मोहम्मद आसिफ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर संघटितपणे आवाज उठवत भविष्यातही भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Popular Articles