spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महसूल व कृषी विभागाच्या वतीने विशेष शिबिर संपन्न

– १६८ लाभार्थ्यांनी घेतला लाभ सेवा संकल्प अभियान

 यवतमाळ :- सेवा संकल्प अभियानातंर्गत अकोला बाजार येथील कोलाम प्रवर्गातील नागरिकांसाठी महसूल विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ३० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय सेवा व दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन मंडळ अधिकारी प्रीतम गोडे आणि ग्राम महसूल अधिकारी आकाश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबिरामध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्र, आधार कार्ड अपडेट यांसारख्या विविध महत्त्वाच्या सेवा नागरिकांना थेट उपलब्ध करून देण्यात आल्या.

या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण १६८ लाभार्थ्यांनी या विविध योजनांचा व सेवांचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे.

Popular Articles