– “अखिलेशचे यश हे संस्थेतील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी”; संचालक मनीष पाटील
– महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीच्या ‘अखिलेश पाटील’ यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल कौतुक व सत्कार सोहळा..!
नागपूर :- महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीचा गुणवंत विद्यार्थी ‘अखिलेश राहुल पाटील’ याने UPSC NDA परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे संचालक मनीष पाटील यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेच्या वतीने मनीष पाटील यांच्या हस्ते अखिलेशचा शाल व पुष्गुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. हा कौतुक व सत्कार सोहळा नुकताच महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनी, झाल्टा फाटा, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर येथील सांस्कृतिक सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आयोजित कौतुक व सत्कार सोहळ्याप्रसंगी संचालक मनीष पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अखिलेशच्या यशाचे विशेष कौतुक केले. तसेच NDA परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, वेळेचे व्यवस्थापन, नियमित सराव, शारीरिक तंदुरुस्ती, स्वयंशिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनत यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ते पुढे म्हणाले, “यश मिळवण्यासाठी केवळ स्वप्ने पाहून चालत नाही, तर त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांची जोड आवश्यक असते,” असा मोलाचा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीच्या अखिलेशचे यश हे संस्थेतील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, त्याच्या यशातून प्रत्येक विद्यार्थ्याने प्रेरणा घेऊन आपल्या ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. अखिलेश पाटील याचे अभिनंदन करत त्याच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूरचे संस्थापक, अध्यक्ष, साप्ताहिक साहित्यगंध व बिनधास्त न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक व मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेचे प्रकाशक ‘राहुल पाटील’ व संस्थेच्या सचिव ‘पल्लवी पाटील’ यांचा अखिलेश पाटील हा चिरंजीव आहे. अखिलेशने गतसालीही एनडीए पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होत भरारी घेतली होती. कमी वयात उत्तीर्ण होणारा तो एकमेव विद्यार्थी होता. भारतीय सेनेत दाखल होऊन देशसेवा करण्याची स्वप्ने पूर्णत्वास आणण्यासाठी जिद्द, चिकाटी व कठोर परीश्रम करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा असल्याचे अखिलेशचे पालक सांगतात.
अखिलेशने पहिल्याच प्रयत्नात दोनदा यश संपादन केल्याने सूर्यकांत जोग दीपशिखा गुरूकुल सैनिक स्कूल, चिखलदरा जि.अमरावती येथील कमाडंट मा.संग्राम दळवी, समीर सर, वैद्य सर यांनीही कौतुक करत शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र सैनिक प्रबोधीनीतर्फे सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वृंद मनोज पाटील, शिंदे सर यांनीही शुभेच्छा दिल्यात. अखिलेशच्या यशाचा अभिमान असल्याचे बहिण कु.हर्षिता पाटील हिनेही कौतुक केले. सोबतच अखिलेशचे मामा झेनिथ जवादे, मामी विजेता जवादे, आजी श्रीमती कुसुम जवादे, चि.आदित्य जवादे यांच्यासह डॉ.निलिमा डोंगरे, प्रा.मनोज डोंगरे, श्रेयस डोंगरे, मुंबई, अशोक पाटील, चंद्रपूर, जोतिराव बारसागडे, प्रशांत सोमकुवर,डॉ. अविनाश परांजपे, नवनाथ बन्सोड, डॉ.नरहरशेट्टीवार, शालिनी शंभरकर आदी आप्तेष्टांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. अखिलेशच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








