spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शिवसेनेचा सार्वजनिक बांधकाम विभागात धरणे आंदोलन

विकासकामांना तांत्रिक मंजुरी न मिळाल्याने आमदार नितीन देशमुख आक्रमक

अकोला १३ : बाळापूर मतदारसंघातील २० कोटी रुपयांच्या विकासकामांना गेल्या पाच-सहा महिन्यांपासून तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेचे उपनेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह आणि जनतेसह आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले. निमकरडा ते गायगाव आणि अकोला या पालकी मार्गाच्या प्रश्नाकडेही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. बाळापूर मतदारसंघातील २० कोटी रुपयांच्या विकासकामांना सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक मान्यता दिलेली नाही. त्यामुळे मतदारसंघातील जनतेला विकासकामांपासून वंचित ठेवण्याचा हा एक प्रकार आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे उपनेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी धरणे आंदोलनाद्वारे केला आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून विकासकामांना तांत्रिक मान्यता न मिळाल्याने आगर ते उगवा, पारस ते निमकरडा आणि मतदारसंघातील इतर रस्त्यांची विकास कामे ठप्प झाली आहेत. बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी एका आंदोलनाद्वारे गंभीर आरोप केला आहे की, हा लोकांना अडचणीत आणण्याचा आणि विकासकामांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे. बाळापूर मतदारसंघात २० कोटी रुपयांची विकासकामे तसेच निविदा प्रक्रिया राबवली गेली नसल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे, जो अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत २० कोटी रुपयांच्या विकासकामांना तांत्रिक मान्यता न मिळाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Popular Articles