spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कॉलेजमधील महिला प्राध्यापकावर वरिष्ठांचा लैंगिक छळ व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

 

महिला प्राध्यापकवर दोन वरिष्ठांकडून लैंगिक छळ व धमकी; बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

नागपूर १३ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमधील महिला सह-योगी प्राध्यापक डॉक्टर यांनी कॉलेजमधील दोन वरिष्ठांवर लैंगिक छळ, अश्लील वर्तन व जीवितास धोका निर्माण करणाऱ्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करत बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींची नावे रवि मेंढे (वय ६०, रा. ईंदोरा, नागपूर) व डॉ. अरुण जोसेफ (वय ६६, रा. रेशीमबाग, नागपूर) अशी आहेत.

तक्रारीनुसार, २० मे २०२५ रोजी सकाळी अंदाजे ११ ते ११.३० दरम्यान कॉलेजच्या कार्यालयात झालेल्या वादविवादादरम्यान डॉ. अरुण जोसेफ यांनी तक्रारदारांच्या अंगावर धावून जात अश्लील हातवारे केले, लज्जास्पद शब्द वापरले आणि “तुझी अवस्था अशी करीन की तू आत्महत्या करशील” अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. त्यानंतर २३ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ ते ४.३० वाजता कॉलेज गेटबाहेर, तक्रारदार गाडीमध्ये बसलेली असताना आरोपी रवि मेंढे यांनी हात पकडून धक्का देत लैंगिक संबंधांची मागणी केली आणि “तुला प्रिन्सिपल बनवीन, त्रास होऊ देणार नाही” अशी प्रलोभने दिली.

तक्रारदारांच्या मते, वरिष्ठांना वारंवार कळवूनही आरोपींवर संस्थेमार्फत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवून दोन्ही आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

ही तक्रार परिपोउपनि. आडे यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात ११ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजता नोंदवली असून भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ मधील कलम ७४, ३५१(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

@filephoto

Popular Articles