spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दुष्काळावर मात करण्यासाठी विविध विभागांशी समन्वय साधावा

· मृद व जलसंधारण, ग्रामविकास आणि रोहयो विभागाच्या एकत्रित बैठकीत निर्देश

· जलसंधारण, रोजगार हमी आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत योजनेच्या कामांमध्ये सुसूत्रता आणण्यावर भर

मुंबई :- राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग, ग्रामविकास व पंचायतराज विभाग आणि रोजगार हमी योजना (रोहयो) विभागाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे एकत्रित बैठक पार पडली.

मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यात राबविण्यात येणारी जलसंधारणाची कामे, रोहयोअंतर्गत होणारी कामे आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत योजना यांची कामे परस्पर समन्वयाने व अभिसरणाच्या माध्यमातून राबवावीत. विविध योजनांमधील कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी करताना सुसूत्रता राखून उपलब्ध मनुष्यबळ, साधनसंपत्ती आणि निधीचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना गती देणे, विविध विभागांमध्ये समन्वय वाढविणे आणि योजनांच्या अंमलबजावणीत एकात्मिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावर संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कामांचे नियोजन करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, तसेच रोजगार हमी योजना विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज उपस्थित होते. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

Popular Articles