बेला :- जवळच्या टाकळघाट येथील रिपाई आठवले गटाचे हिंगणा व नागपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख नितेश खडसे यांनी पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी शेतकऱ्यांच्या संकटाविषयी सविस्तर चर्चा करून त्यांना तातडीने दिवाळीपूर्वी भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केली. पुरेसा पाऊस न झाल्यामुळे दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांवर कोसळले आहे त्यामुळे सरसकट कर्जमाफी तात्काळ देण्यात यावी. व पीक नुकसानीची भरपाई सुद्धा मिळावी सोबतच दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा म्हणून पंधरा ते वीस हजार रुपयाची एकरी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात यावी. दिवाळीनंतर मात्र प्रति एकर एक लाख रुपये शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. अशी मागणी खडसे यांनी बावनकुळे यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.असे खडसे यांनी सांगितले.








