– मासिक व भव्यतम सोडतीतील १२ हजार ७३१, तर साप्ताहिक सोडतीतील ४५ हजार ७७४ तिकिटांना लाभ
मुंबई :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे वर्षभरात सहा भव्यतम सोडती, दर महिन्याला पाच मासिक सोडती तसेच दररोज विविध साप्ताहिक सोडती आयोजित केल्या जातात. सप्टेंबर २०२६ मध्ये महाराष्ट्र सह्याद्री, महाराष्ट्र गणेशलक्ष्मी गणपती विशेष, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र तेजस्विनी, महाराष्ट्र गणपती (भव्यतम) आणि महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या. या सोडती अनुक्रमे ११, १५, १६, १९, २४ आणि २९ सप्टेंबर रोजी झाल्या.
२४ सप्टेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र गणपती (भव्यतम) सोडतीत प्रत्येकी दोन लाख रुपयांची चार द्वितीय बक्षिसे, तसेच प्रत्येकी एक लाख रुपयांची चार प्रोत्साहनपर बक्षिसे जाहीर झाली आहेत. याशिवाय महाराष्ट्र सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतींमधून प्रत्येकी सात लाख रुपयांची प्रथम क्रमांकाची एकूण सहा बक्षिसे जाहीर झाली आहेत.
सप्टेंबर महिन्यातील मासिक व भव्यतम सोडतींमधून १२ हजार ७३१ तिकिटांना एकूण ५९ लाख ४ हजार ३५० रुपयांची, तर साप्ताहिक सोडतींमधून ४५ हजार ७७४ तिकिटांना एकूण १ कोटी ६९ लाख २० हजार ७०० रुपयांची बक्षिसे जाहीर झाली आहेत.
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या सर्व विजेत्यांनी बक्षिसाची रक्कम मिळविण्यासाठी राज्य लॉटरीच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद केलेली प्रक्रिया पूर्ण करावी. दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या बक्षिसासाठी आवश्यक कागदपत्रांसह मागणी संबंधित कार्यालयाकडे सादर करावी. दहा हजार रुपयांपर्यंतच्या बक्षिसाच्या रकमेसाठी लॉटरी विक्रेत्यांकडे संपर्क साधावा, असे आवाहन उपसंचालक, महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी केले आहे.








