– आदिनाथ गुरूमाऊली सेवाश्रमात कार्यक्रम
बेला :- जवळच्या राष्ट्रीय महामार्गावरील बरबडी येथील आदिनाथ गुरू माऊली सेवाश्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरला दमा औषधीचे विनामूल्य वाटप करण्यात आले. याचा २२१ रुग्णांनी लाभ घेतला. याशिवाय ४५० उपस्थितीत भाविकांनी कोजागिरी पौर्णिमेचे चंद्रकिरणात आटवलेले दुध प्राशन केले.यावेळी ब्रह्ममूर्ती शेषानंद महाराजांनी उपस्थितांना कोजागिरीचे महत्त्व सांगितले.
सर्वप्रथम पारंपारिक संस्कृतीनुसार भुलाबाईचे गाणे म्हणून पुजन करण्यात आले.सामुहिक आरतीचा भाविकांनी लाभ घेतला.मध्यरात्री चंद्रकिरणात पंचवटीत आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामगीताचार्य ओम प्रकाश पांडे (भद्रावती) यांनी केले. त्यांनी दमा औषधीचे महत्त्व व पथ्य सुद्धा समजावून सांगितले. विवेक नान्हे यांनी गुरू चे महत्व पटवुन दिले. मागील वर्षाप्रमाणे यंदाही हिंगणघाट येथील निर्मला रामदास भोयर यांनी रुग्णांसाठी औषधी उपलब्ध करून दिली. तर मंगेश रेवाडे यांचे सहकार्याने दूध मिळाले. यशस्वीतेसाठी प्रकाश घवघवे, आकाश ठाकरे, इंद्रदेव धोटे, शुभम नरूले, संतोष वैरागडे, भगत टेकाम, फ्त्तु लाखडे,नामदेव सातपुते, श्रीकृष्ण खामनकर, देवराव किंगरे, सुदर्शन कोरडे, गुरू आई मंदा पांडे,रामप्यारी चंदेल, स्वाती नान्हे, ममता पांडे, सुंदर निमसडे, व आदिनाथ गुरू माऊली सेवा मंडळाचे अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.








