Related Posts

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीला वेग; १९ नोव्हेंबरपूर्वी विधान भवनातील सर्व व्यवस्था पूर्ण करा

<p><strong>&&num;8211&semi; विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्याकडून आढावा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; मोर्चास्थळी वैद्यकीय सुविधा आणि मोबाईल टॉयलेट्सची पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे करण्यात येणाऱ्या विविध प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज आढावा घेतला&period; विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तयारीची माहिती घेतली&period; येत्या १९ नोव्हेंबरपासून विधानभवनातील कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी येण्यास सुरुवात होणार असल्याने त्यापूर्वी विधान भवनातील सर्व आवश्यक व्यवस्था पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>हिवाळी अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागांतून मंत्री&comma; लोकप्रतिनिधी&comma; वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी&comma; कर्मचारी&comma; प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने नागपूरमध्ये येतात&period; अधिवेशनाच्या कालावधीत शहरातील प्रशासकीय यंत्रणा आणि विविध सार्वजनिक सुविधांवर अतिरिक्त जबाबदारी येते&period; त्यामुळे अधिवेशनाशी संबंधित सर्व विभागांनी आतापासूनच नियोजन करून निर्धारित कालमर्यादेत आपापली कामे पूर्ण करावीत&comma; असे निर्देश त्यांनी दिले&period; अधिवेशन काळात शहरात वाहनांची वर्दळ वाढण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यावरही भर देण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>अधिवेशन काळात विविध मागण्यांसाठी सामाजिक संघटना&comma; कर्मचारी संघटना आणि अन्य संघटनांकडून मोर्चे व आंदोलने आयोजित केली जातात&period; या पार्श्वभूमीवर मोर्चा आयोजित होणाऱ्या ठिकाणी पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्यात&period; आवश्यकतेनुसार आरोग्य यंत्रणेची मदत उपलब्ध होईल&comma; असे नियोजन करावे&period; नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक ठिकाणी मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था करण्याबाबतही विभागीय आयुक्त बिदरी यांनी सूचना दिल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस&comma; महसूल&comma; सार्वजनिक बांधकाम&comma; आरोग्य&comma; परिवहन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह संबंधित विभागांची भूमिका महत्त्वाची असते&period; प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदाऱ्यांचे योग्य नियोजन करावे&period; एका विभागाच्या कामाचा परिणाम दुसऱ्या विभागाच्या व्यवस्थेवर होणार नाही&comma; याचीही दक्षता घ्यावी&period; आवश्यक त्या ठिकाणी परस्पर समन्वयातून निर्णय घेऊन कामे वेळेत पूर्ण करावीत&comma; असे विभागीय आयुक्तांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>अधिवेशनासाठी नागपूरमध्ये येणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विविध कामांसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे&period; त्यामुळे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व संबंधित विभागांनी पूर्वतयारी पूर्ण करून आपापल्या व्यवस्थांची खातरजमा करावी&comma; अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>या बैठकीला सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी &comma; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद&comma; नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार&comma; विभागीय सह आयुक्त तुषार मठकर यांच्यासह संबंधित कार्यान्वयन यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;