Related Posts

समता नगर, बाबादीप नगर परिसरात अंधाराचे साम्राज्य अन् खडतर रस्ते; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> उत्तर नागपूर क्षेत्रातील आशी नगर झोन अंतर्गत येणाऱ्या समता नगर&comma; बाबादीप नगर आणि आदिवासी ले आउटसह परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे&period; परिसरात पथदिवे बंद असल्यामुळे पसरणाऱ्या अंधारासोबतच&comma; रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि खड्ड्यांमुळे स्थानिक रहिवाशांचे जगणे बेहाल झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये अजुनही पक्के रस्ते &lpar;सिमेंट&sol;डांबरीकरण&rpar; तयार करण्यात आलेले नाहीत&period; ठीकठिकाणी पडलेले मोठे खड्डे आणि कच्च्या रस्त्यांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे&period; या खडतर व खड्डेमय रस्त्यांमुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिक&comma; महिला आणि लहान मुलांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे&period; तसेच अंधारात हे खड्डे न दिसल्याने रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत&period; याशिवाय&comma; समता नगर पुलाजवळ प्रशासनाकडून बसवण्यात आलेल्या दोन हायमास्ट लाईटपैकी एक हायमास्ट पूर्णपणे बंद असून दुसऱ्यावर केवळ दोनच दिवे सुरू आहेत&period; गल्लीबोळांतील पथदिवेही बंद असल्याने संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे&period; या परिस्थितीचा फायदा घेत चोऱ्या व असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या सर्व समस्यांची गांभीर्याने दखल घेत शिवसेना &lpar;उद्धव बाळासाहेब ठाकरे&rpar; पक्षाचे विधानसभा प्रमुख नितीन सोळंके यांनी आशी नगर झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांना निवेदन सादर केले&period; निवेदनात मागणी करण्यात आली आहे की&comma; विद्युत विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी रात्रीच्या वेळी स्वतः फिरून बंद पथदिव्यांची पाहणी करावी आणि दुसऱ्या दिवशी दुरुस्ती पथकाकडून ते दुरुस्त करून घ्यावेत&period; तसेच खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करून पक्के रस्ते त्वरित तयार करण्यात यावेत&period; हे निवेदन विद्युत विभागाचे मुख्य अधिकारी प्रदीप खोब्रागडे यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे&period; आगामी दिवाळीच्या सणापूर्वी बाबादीप नगर व समता नगर परिसरातील बंद पथदिवे सुरू करून विद्युत रोषणाई करावी आणि रस्त्यांची दुर्दशा दूर करावी&comma; अशी ठाम मागणी नितीन सोळंके यांनी केली आहे&period; प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;