spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

यवतमाळ १८ : यवतमाळ येते स्थित जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा भव्य व उत्साहपूर्ण सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा संयोजक श्री प्रताप नवघरे, राष्ट्रीय सेविका समितीच्या सह-बौद्धिक प्रमुख डॉ. वृंदा देशमुख, तसेच गव्हर्मेंट आयटीआय कॉलेजचे मॅनेजमेंट मेंबर श्री निखिल गाढवे हे मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाजू, सचिव आशिष जाजू, कोषाध्यक्ष व शाळेच्या डायरेक्टर-प्राचार्या शिल्पा जाजू, प्रिन्सिपल डॉ. महेश नांदेकर आणि समन्वयक सुचिता पारखे यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष प्रकाश जाजू यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. *कोटी कोटी ने गाया माँ का गौरव गान हे* या विशेष सामूहिक गीताने कार्यक्रमाला राष्ट्रीयतेचा साज चढवला. काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करत आपल्या मनोगतांतून देशभक्तीची भावना व्यक्त केली.
प्रमुख पाहुण्या डॉ. वृंदा देशमुख यांनी भारताचा इतिहास, स्वातंत्र्याचे महत्त्व व स्वाभिमानाचे जतन करण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तर डायरेक्टर-प्राचार्या शिल्पा जाजू यांनी विद्यार्थ्यांना देशाचा गौरव वाढवण्यासाठी कार्य करावे व आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराध्य गणोरकर व श्रीनम दूदुलवार यांनी केले
या सोहळ्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.