spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अंमली पदार्थांची मोठी खेप जप्त; तिघे आरोपी अटकेत

– २८३ ग्रॅम डोडा पावडरसह २८ लाख ६५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त

बोरी :-  हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा, अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि मयंक माधव, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी, नागपूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनात अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक नागपुर ग्रामीण आणि बोरी पोलीसांनी संयुक्त कारवाई करत दिनांक १०/११/२०२६ व ११/११/२०२६ रोजी एनडीपीएस कायदयांतर्गत मोठी कारवाई करत एकुण १४३ किलो २८३ ग्रॅम डोडा पावडर अंमली पदार्थ किंमती २८,६५,५२०/- रूपये व इतर साहित्य असा एकुण ३९,२५,६२०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १०/११/२०२६ रोजी नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक तसेच पोस्टे बोरी हे संयुक्तरीत्या पोस्टे बोरी हद्दीत अंमली पदार्थ कायदयान्वये रेड कारवाईकामी पेट्रोलींग करीत असतांना वर्धा बुट्टीबोरी मार्गावरील हळदगाव बस थांबा जवळ एक महेंद्रा बोलेरो वाहन क्र. आर. जे-२१/जी. एफ-२६४२ ही संशयितरीत्या आढळुन आल्याने पंचासमक्ष आरोपी वाहन चालक नामे महेंद्र झुमरराम खदाव, वय २५ वर्ष, रा. पालळी रणावता, त. भोपालगढ, जि. जोधपूर, राजस्थान याची झडती घेतली असता एकुण ११२३ ग्रॅम अफुच्या बोंडापासुन तयार केलेला डोडा पावडर किंमती २२,५००/- रूपयाचा अंमली पदार्थ मिळुन आल्याने पंचासमक्ष सदर अमंली पदार्थ तसेच महेंद्रा बोलेरो वाहन क्र. आर जे-२१/जी. एफ-२६४२ किंमती अंदाजे १०,००,०००/- रूपये, ०१ विवो कंपनीचा अॅडरॉइड मोबाईल किंमती ५,०००/- रूपये असा एकुण १०,२७,५००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे कलम ८ (क), १५(ब), २९ एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली.

गुन्हयाच्या पुढील तपासात आरोपीने सदर अंमली पदार्थ डोडा पावडर हा चौधरी राजस्थानी धाबा, कारंजा घाडगे, जि. वर्धा चा मालक पप्पु चौधरी याचेकडुन विकत घेतल्याची माहिती तपासाच्या बॅकवर्ड लिंकद्वारे उघड झाल्याने आरोपीच्या मोबाईल फोनवरून UPI अॅपच्या माध्यमाने अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी आरोपी पप्पु चौधरी यास ऑनलाईल पेमेंट केल्याचे दिसुन आल्याने दि. ११/११/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी आरोपी पप्पु चौधरी याच्या चौधरी राजस्थानी धाबा, कारंजा घाडगे, जि. वर्धा येथे जावुन पंचासमक्ष आरोपी पप्पु चौधरी व त्याच्या धाब्याची झडती घेतली असता हॉटेलमधुन एकुण १४२ किलो १५१ ग्रॅम डोडा पावडर अंमली पदार्थ मिळुन आला. सदर अंमली पदार्थ व आरोपी नामे पप्पू मोडाराम चौधरी वय ३५ वर्ष रा. कामनई ता. सीनघरी जि. बालोतरा राजस्थान (हॉटेल मालक), ह. मु. चौधरी राजस्थानी धाबा कारंजा घाडगे, जि. वर्धा व त्याचा सहकारी हडमानराम चिमाणराम सारण, वय ३० वर्ष, रा. खारा, ता. सीनघरी जि. बालोतरा राजस्थान ( हॉटेल कूक) ह. मु. चौधरी राजस्थानी धाबा कारंजा घाडगे यांना ताब्यात घेण्यात आले. व आरोपीतांकडुन १४२ किलो १५१ ग्रॅम डोडा पावडर अंमली पदार्थ किंमती २८,४३,०२०/- रूपये, ०२ मोबाईल किंमती २५,०००/- रूपये, एक मिक्सर मशीन किंमती २२,०००/- रूपये, इलेक्ट्रिक वजन काटा व कॅल्क्युलेटर किंमती ५५००/- रूपये, नगदी २६००/- रूपये असा एकुण २८,९८,१२०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अशा प्रकारे नमुद कारवाईत एकुण १४३ किलो २८३ ग्रॅम डोडा पावडर अंमली पदार्थ किंमती २८,६५,५२०/- रूपयाचा अंमली पदार्थासह एकुण ३९,२५,६२०/- रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हयात आणखी इतर आरोपीच्या शोध बाबत तसेच बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकबाबत मा. श्री हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा, श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांचे मार्गदर्शनात अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर ग्रामीण जिल्हा व पोलीस स्टेशन बुट्टीबोरी मार्फत संयुक्तरीत्या तपास सुरू आहे.

Popular Articles