– ५२ पत्त्यांवर सुरू होता जुगार; ९ लाख ९४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
वडोदा :- वडोदा पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन वडोदा क्षेत्रातील मौजा परसोडी येथील धार्मिक फार्महाऊस जवळील मोकळ्या लेआउट येथे काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे वडोदा पोलीस घटनास्थळी पोहचले असता, नमुद घटनास्थळी काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना दिसुन आले. पोलीसांनी आरोपी नामे १) शरद वाल्मीक वैद्य, वय ३७ वर्ष, रा. वार्ड क्र. ९, साई मंदिराजवळ, बिडगाव, ता. कामठी, जि. नागपूर. २) प्रकाश देवराव डोईफोडे, वय ५१ वर्ष, रा. वार्ड क्र. ३, टेमसना, ता. कामठी, जि. नागपूर ३) नितेश मधुकर रोहनकर, वय ४० वर्ष, रा. वार्ड क्र. १, हनुमान मंदिराजवळ, दिघोरी काळे, ता. कामठी, जि. नागपूर ४) दिनेश सुदाम ढवळे, वय ४३ वर्ष, रा. वार्ड क्र. ३८, जुनी दिघोरी बस स्टॉपजवळ, ता.नागपूर. ५) सुभाष रामचंद्र खुळे, वय ३० वर्ष, रा. तरोडी, ता. कामठी, जि. नागपूर यांना ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना जागीच पकडले. ०३ आरोपी घटनास्थळाहुन पळुन गेले. पोलीसांनी घटनास्थळावरून ५२ तासपत्ते आणि रोख रक्कम ५७,७००/- रूपये, ०५ मोबाईल, ०८ दुचाकी वाहने, ईतर साहित्य असा एकुण ९,९४,७५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद ०८ आरोपीतांविरूद्ध पोलीस स्टेशन वडोदा येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.






