– २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त
नागपूर :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल म्हस्के अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची निर्मिती, विक्री तसेच दारूचे सेवन तसेच वाहतूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात आली. सदर कारवाईदरम्यान दारूबंदी कायद्यान्वये एकूण ३७ गुन्हे दाखल करण्यात आले.
सदर कारवाईमध्ये पोलीस स्टेशननिहाय दाखल गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पोलीस स्टेशन पाचगाव येथे आरोपी नामे राजकुमार वडतास पवार, वय ५६ वर्ष, रा. चांपा बेडा ता. उमरेड जि. नागपूर याचेवर ०१ गुन्हा नोंद करून आरोपीकडुन १० लिटर मोहाफुल दारू किंमती ५००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस स्टेशन भिवापूर येथे आरोपी नामे देवांगना इसमान पेंदाम, वय ४३ वर्ष, रा. भोवरी, ता. भिवापुर, जि. नागपुर याचेवर ०१ गुन्हा नोंद करून आरोपीकडुन देशी दारूच्या १३ निपा किंमती १०४०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस स्टेशन उमरेड येथे आरोपी नामे १) रानाकुमार संतोष मंडल, वय २१ वर्ष, रा. भवानीपुर पंचायत पोस्ट ग्राम बलीया, जि. पोर्णीया ठामा बिहार ह.मु. सोयाबिन कंपनी धुरखेडा हा सार्वजनिक ठिकाणी दारू पितांना मिळून आल्याने त्याचेवर ०१ गुन्हा नोंद, तसेच २) वंश सुखदेव तांबे, वय २३ वर्ष, रा. तारणा याचेवर ०१ गुन्हा नोंद करून आरोपीकडुन देशी दारूच्या १० निपा किंमती ९००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ३) महिला आरोपी हिचेवर ०१ गुन्हा नोंद असुन आरोपींकडुन १० लिटर मोहाफुल गावठी दारू किंमती १०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस स्टेशन वेलतूर येथे आरोपी नामे अंकुश बाबाजी बावने, वय ४४ वर्ष, रा. पचखेडी, ता. कुही जि. नागपुर याचेवर ०१ गुन्हा नोंद करून आरोपीकडुन देशी दारूच्या ०८ निपा किंमती ६४०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी येथे आरोपी नामे राजेन्द्र दिंगाबर राव Activ इंगोले, वय ६१ वर्षे, रा. टेकटाउन बिल्डीग ए वन वर्धा रोड, एम आय डी सी बुटटीबोरी, ता. हिंगणा, जि. नागपुर याचेवर ०१ गुन्हा नोंद करून आरोपीकडुन देशी दारूच्या ०९ निपा किंमती ७२०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.






