spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्यांना गती

–  २५ विधानसभा मतदारसंघांत सह-अध्यक्षांची नियुक्ती

• फडणवीस सरकारचा निर्णय

–  तातडीने कार्यवाही करण्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई :- ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची अमलबजावणी प्रभावी व वेगवान होण्यासाठी राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघांतील क्षेत्रस्तरीय समित्यांवर ‘सह-अध्यक्ष’ नियुक्त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशावरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला. या संदर्भात महसूल विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

राज्यातील ९१ विधानसभा मतदारसंघांमध्ये यापूर्वी १५ जुलै २०२६ रोजी सह-अध्यक्षांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता उर्वरित २५ मतदारसंघांतील समितीच्या कामकाजाला गती देण्यासाठी नवीन सह-अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या नियुक्त प्रतिनिधींचा समित्यांमध्ये तात्काळ समावेश करून कामकाज सुरू करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.

नवनियुक्त २५ मतदारसंघ आणि सह-अध्यक्षांची नियुक्ती –

* शहादा – नितीन शंकर पाटील

* हिंगणा – धनराज विठोबाजी आष्टणकर

* तिरोरा – चत्रभुज सेगोजी बिसेन

* गडचिरोली (अ.ज.) – रमेश कवळू बारसागडे

* चंद्रपूर (अ.जा.) – नामदेव बबनराव डाहूले

* चिमूर – राजू कवडुजी झाडे पाटील

* वरोरा – विठ्ठल हरबाजी लेडे

* यवतमाळ – श्याम उर्फ विनोदचंद्र द्वारकाप्रसाद जयस्वाल

* हिंगोली – शंकर घनश्याम बोराडे

* फुलंब्री – राणी ज्ञानेश्वर सोनवणे

* डहाणू (अ.ज.) – ज्योती प्रशांत पाटील

* विक्रमगड (अ.ज.) – सुशील अनंतराव औसरकर

* भिवंडी पश्चिम – गजानन गंगाराम आसवारे

* खडकवासला – नवनाथ बबनराव तागुंदे

* शेवगाव – राधाकिसन नारायण कर्डिले

* श्रीगोंदा – दादासाहेब पोपटराव जंगले पाटील

* बीड – डॉ. योगेश भारतभूषण क्षीरसागर

* केज (अ.जा.) – विजयकांत विक्रमराव मुंडे

* लातूर शहर – चंद्रकांत विनायक खटके

* सोलापूर दक्षिण – मनीष सुभाष देशमुख

* शाहूवाडी – प्रकाश बळवंत देशमुख

* हातकणंगले – मकरंद बाळकृष्ण बोराडे

* सांगली – राहुल महावीर सकळे

* शिराळा – अशोक बाबुराव पाटील

* पलूस-कडेगाव – सत्यजित वसंतराव यादव देशमुख

गावपातळीवरील शेत आणि पाणंद रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. स्थानिक पातळीवरील सह-अध्यक्षांच्या नेमणुकीमुळे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी थेट समितीपर्यंत पोहोचून रस्त्यांची कामे मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Popular Articles