spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महामार्ग क्रं. ४४ वर बॅरिकेडिंगच ठरतेय अपघाताचे कारण ? 

– डुमरी स्टेशन राधाराणी धाब्याजवळ आणखी एका व्यक्तीचा मृत्यु 

कन्हान :- नागपुर जबलपुर महामार्गाने मनसर कडुन नागपुरकडे जाणाऱ्या महामार्गावरील डुमरी रेल्वे स्टेशन येथे एकीकडील उडान पलाच काम सुरू असुन अपघातांची मालिका सुरूच; उडान पुलाच्या कामादरम्यान केलेल्या बॅरिकेडिंग व्यवस्थित नसल्याने वाहन चालकाना एकाएक बॅरिकेड दिसुन सामोर रस्ता अरूंद असल्याने वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटुन अपघात होत निर्दोषांचा बळी जात आहे. महामार्ग वाहतुक पोलीस वेळीच घटनास्थळी पोहचत नसल्याने स्थानिक संतापल्याचे चित्र दिसत आहे.

शनिवार (दि.१४) ला सायंकाळी ५ वाजता नागपुर जबलपुर राष्टीय महामार्ग क्र. ४४ वर डुमरी रेल्वे स्टेशन येथे एकी कडील उडान पलाच काम सुरू असुन मनसर कडुन नागपुरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महा मार्ग क्रं. ४४ वरील अण्णा मोड, राधाराणी धाब्या जवळ आणखी एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे.

महामार्गावर लावण्यात आलेल्या बॅरिकेडिंगला दुचाकी क्रं. एम एच ४० आर ७२४१ वाहनाची जोरदार धडक बसल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृत व्यक्तीचे नाव जावेद अख्तर मोहम्मद युसूफ शरीफ असल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी उडान पुलाचे बांधकाम सुरू असुन वाहनांच्या सुरक्षिततेसाठी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. मात्र, ही बॅरिकेडिंग ज्या पद्धतीने करण्यात आली आहे, तीच वाहन चाल कांसाठी धोकादायक ठरत असल्याचा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जबलपुर ते नागपूरकडे जाणारा हा महामार्ग असल्याने वाहनांचा वेग तुलनेने जास्त असतो. त्यातच संबंधित ठिकाणी रस्त्याला वळण असुन काही अंतरा वर रस्ता अचानक अरुंद होतो. महामार्गावर वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना अचानक समोर येणारे बॅरिकेडिंग आणि रस्त्याच्या रुंदीतील बदल यामुळे वाहनावर नियंत्रण मिळवणे कठीण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वाहन अनियंत्रित होऊन गंभीर अपघात घडतात. विशेष म्हणजे याच परिसरात यापूर्वी ट्रॅव्हल्स बस पलटी होऊन वाहन चालकाचा मुत्यु झाला होता तर १० प्रवाशी जख्मी झाले होते. आता पुन्हा एका दुचाकी चालकाचा घटनास्थळी जीव गेल्याने घटनास्थळी लांबुन कन्हान पोलीस पोहचतात परंतु टेकाडी बंद टोल नाक्यावरील महामार्ग वाहतुक पोलीस पोहचत नसल्याने स्थानीय नागरिकामध्ये माहामार्ग वाहतुक पोलीसा विषयी रोष निर्माण होत या ठिकाणच्या महामार्ग वाहतुक पोलीसाच्या कार्य प्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमकी चूक कोणाची आणि जबाबदारी कोणाची ? असा गंभीर प्रश्न संतप्त नागरिक करित आहे.

Popular Articles