रामटेक :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल म्हस्के अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा आणि रमेश बरकते उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस स्टेशन रामटेकचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांचे नेतृत्वात दि. १४/११/२०२६ रोजी पोलीस स्टेशन रामटेक हद्दीतील ग्रीनलँड रिसोर्ट येथे मोठमोठया व कर्णकर्कश आवाजामध्ये डीजेवर गाणी वाजवणारे जिल्हाधिकारी नागपूर जिल्हा यांचे आदेशाचे उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण करताना ग्रीनलँड रिसॉर्टचे मालक नामे १) प्रशांत नारायणराव किमतकर, वय ५१ वर्षे, रा. शास्त्री वॉर्ड, रामटेक व रिसोर्ट चालक नामे २) दिलीप काशीनाथ पातुरकर, वय ४० वर्षे, रा. मु. शितलवाडी, रामटेक, जि. नागपूर हे प्रत्यक्ष मिळुन आल्याने त्यांचेविरूद्ध पोलीस स्टेशन रामटेक येथे कलम २२३ भा.न्या.सं. सहकलम ३८, १३६ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करून घटनास्थळावरून ०२ साऊंड बॉक्स किंमती २०,०००/- रूपये व साऊंड मिक्सींग मशीन किंमती १०,०००/- रूपये असा एकुण ३०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागपूर ग्रामीण पोलीसांद्वारे जनतेस आवाहन करण्यात येते की, डीजेचा वापर करून शासकीय आदेशाचे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण करू नये, असे कृत्य करणाऱ्यांविरूद्ध कायदेशीर गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करण्यात येईल.






