spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध दारू निर्मिती, विक्री आणि सेवन करणाऱ्याविरूध्द विशेष मोहीम १३ गुन्हे दाखल – ९१९०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

नागपूर :-  हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल म्हस्के अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची निर्मिती, विक्री तसेच दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात आली. सदर कारवाईदरम्यान दारूबंदी कायद्यान्वये एकूण १३ गुन्हे दाखल करून एकुण ९१९०/- रूपयाचा दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाईमध्ये पोलीस स्टेशननिहाय दाखल गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पोलीस स्टेशन बेला येथे आरोपी नामे सोनु शतनराव ढोक, वय ३३ वर्ष, रा. कानकाटि कान्द्री ता. समुद्रपुर याचेवर ०१ गुन्हा नोंद असुन आरोपीकडुन देशी दारूच्या ०७ निपा किंमती ५६०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन देवलापार येथे आरोपी नामे विरेंद्र शंकर कोकोडे, वय ३६ वर्ष, रा. करवाही, ता. रामटेक, जि. नागपुर याचेवर ०१ गुन्हा नोंद असुन आरोपीकडुन १० लिटर मोहाफुल गावठी दारू किंमती १०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन जलालखेडा येथे आरोपी नामे मनोज बाबूराव मेश्राम, वय ३१ वर्ष, रा. रोहना, ता. नरखेड, जि. नागपूर हा सार्वजनिक ठिकाणी मदयप्राशन करतांना मिळून आल्याने त्याचेवर ०१ गुन्हा नोंद. तसेच महिला आरोपी ०१ गुन्हा नोंद असुन आरोपीकडुन २५ लिटर मोहाफुल गावठी दारू, १०० लिटर मोहाफूल सडवा, ईतर साहित्य असा एकुण किंमती ६५००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन काटोल येथे आरोपी नामे १. चतरसिंग कमरसिंग भादा, रा. अर्जुन नगर काटोल, जि. नागपुर याचेवर ०१ गुन्हा नोंद असुन आरोपीकडुन १० लिटर मोहाफुल गावठी दारू किंमती ५००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी १. योगेश नारायन धवड, रा. घरतवाडा काटोल, जि. नागपुर २. दिनेश गोपाल टेकाम, वय ३० वर्ष, रा. भाजीपाणी, ता. काटोल, जि. नागपुर ३. महेश भिमराव ढोके, वय ३० वर्ष, रा. भाजीपाणी, ता. काटोल, जि. नागपुर ४. कौशिक शरदराव सुरजुसे, वय २२ वर्ष, रा. वडपुरा काटोल, ता. काटोल, जि. नागपुर हे सार्वजनिक ठिकाणी मदयप्राशन करतांना मिळून आल्याने त्यांचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा असे ०४ गुन्हे नोंद. तसेच आरोपी प्रभाकर मारोतराव सनेश्वर, वय ६५ वर्ष, रा. अण्णाभाउसाठे नगर काटोल, जि. नागपुर याचेवर ०१ गुन्हा नोंद असुन आरोपीकडुन १५ लिटर मोहाफुल गावठी दारू किंमती ७५०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन नरखेड येथे आरोपी नामे १. राजेन्द्र दौलतराव शेळके, वय ३९ वर्ष, रा. शेमडा, तह. नरखेड २. रामकृष्णण गजानन बाडबुधे, वय ३४ वर्ष, रा. वार्ड क. ९, नरखेड हे सार्वजनिक ठिकाणी मदयप्राशन करतांना मिळून आल्याने त्यांचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा असे ०२ गुन्हे नोंद, पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी नामे अनुराग राजेन्द्र यादव, वय ३५ वर्ष, रा. शितलामाता मंदीर मागे, यादव नगर कामठी, जि. नागपूर याचेवर ०१ गुन्हा नोंद असुन आरोपीकडुन देशी दारूच्या ११ निपा किंमती ८८०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाईत एकुण ३२४० मिली देशी दारू, ६० लिटर मोहाफुल दारू, १०० लिटर मोहाफुल सडवा व ईतर साहित्य असा एकुण ९१९०/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. तसेच नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला.

Popular Articles