spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दारूच्या नशेत अपघात; महिलेचा मृत्यू, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

अरोली :- अरोली पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अनीता अजय चौके, वय ४२ वर्ष, रा. शिवनगर तुमसर, ता. तुमसर, जि. भंडारा यांनी फिर्याद दिली की, दिनांक १४/११/२०२६ रोजी मौजा वाकेश्वर फाटा येथे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम.एच.-४०/सी.टी.-८६१७ च्या चालकाने दारू पिवुन दारूचे नशेत त्याचे ताब्यात असलेले वाहन निष्काळजीपणे, भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवुन अपघात करून त्याने मोटरसायकल क्र. एम. एच.-४०/ बी.टी. – ५०८१ यास जोरदार धडक देऊन सदर वाहनावरील १) विश्वास वासुदेव भोयर, २) विक्रम वासुदेव भोयर, दोन्ही रा. श्रीखंडा, ता. मौदा, जि. नागपुर ३) आदिती संजय सार्वे, रा. खात रोड भंडारा यांना जखमी केले. तसेच रंजना रामचंद्र चौके, रा. तुमसर, ता. तुमसर, जि. भंडारा यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. आरोपी नामे अनमोल अनील पानतावने, वय २० वर्ष, रा. अरोली, ता. मौदा, जि. नागपुर याला दारूच्या नशेत वाहन चालविल्याने अपघात होवुन मृत्यु होवु शकतो हे माहीती असतांना सुद्धा त्याने त्याच्या ताब्यातील वाहन दारूच्या नशेत भरधाव वेगाने, निष्काळजीपणाने चालविल्याने सदर अपघात होवुन महिलेचा अपघात करून मृत्युस कारणीभुत झाला. तसेच सदर वाहनाने टिनाच्या शेडच्या पोलाला धडक दिल्यामुळे टिनाचे शेड व शेडखाली दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे.

सदर प्रकरणी पोलीस स्टेशन अरोली येथे आरोपी वाहन चालकाविरूद्ध कलम १०५, १२५ (अ), २८१, ३२४ (४) भा.न्या.सं. सहकलम १८४, १८५ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Popular Articles