spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कुटुंब दर्शनाला निघाले आणि वाटेतच मृत्यूने झडप घातली ट्रकच्या धडकेत तिघे ठार

–  ट्रकच्या धडकेत तिघे ठार

पुणे :- सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या पुण्यातील मांडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. यात कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. यात एका चार वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. कर्नाटकातील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी पुण्यातील मांडरे कुटुंब जात होते. रविवारी (१५ नोव्हेंबर) ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मांडरे कुटुंबीय कारने सौंदत्तीकडे जात होते. गोकाक तालुक्यातील मालदिन्नी क्रॉसजवळ समोरून आलेल्या ट्रकने भीषण धडक दिली.

ट्रकची धडक, कार रस्त्याच्या खाली

हा अपघात इतका भीषण होता की, समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यानंतर कारच्या समोरचा भाग चक्काचूर झाला. तर ट्रकही उलटला. ओंकार चंद्रशेखर मांडरे (वय २६), रेश्मा मांडरे (वय ३२) आणि देवांश मांडरे (वय ४) यांचा या भीषण अपघात मृत्यू झाला. तर श्रीकांत मांडरे, वंदना मांडरे आणि हर्षदा मांडरे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर लोकांची घटनास्थळी गर्दी झाली. पोलिसांना याची माहिती देम्यात आली. त्यानंतर तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अपघात ठार झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

या घटनेने मांडरे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुण्यातील त्यांचे घर असलेल्या परिसरावर शोककळा पसरली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अपघात होण्याच्या कारणाचा तपास सुरु केला आहे.

Popular Articles