spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दाभा परिसरात बिबट्याची दहशत कायम  कुत्र्याची शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल, नागरिक भयभीत

नागपूर १८ :  शहरातील दाभा परिसरात बिबट्याच्या सततच्या वावरामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. संपत हाऊसिंग सोसायटी परिसरात गुरुवारी रात्री १.३० वाजता बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही बिबट्याने अनेक वेळा परिसरात कुत्र्यांची शिकार केली आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की गेल्या १५ दिवसांपासून बिबट्या सातत्याने या परिसरात फिरत असून, दर दोन-तीन दिवसांनी तो कुत्र्यांवर हल्ला करतो. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नागरिकांनी बिबट्या आपल्या दोन पिलांसह दिसल्याचेही पाहिले आहे.

वन विभागाकडून दिरंगाईचा आरोप
रहिवाशांनी वन विभागाला वारंवार माहिती दिल्याचे सांगितले, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. “वेळेत उपाययोजना न केल्यास बिबट्याची शिकार प्राण्यांपुरती मर्यादित राहणार नाही, भविष्यात तो माणसांवरही हल्ला करू शकतो,” अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. बिबट्याच्या भीतीने संध्याकाळनंतर कोणीही घराबाहेर पडत नाही. महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याचे आणि परिसरात गस्त वाढवण्याचे मागणी नागरिक करत आहेत.

सुरक्षिततेसाठी तत्काळ उपायांची गरज
सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओमुळे दहशत वाढली असून, नागरिक वन विभागाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत आहेत. भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.

Popular Articles