spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वर्षा तुरकर हिचा संशयास्पद मृत्यू

– मित्रासोबत फिरायला गेल्यानंतर घडला प्रकार

गोंदिया :- पुणे विमानतळावर इंडिगो एअरलाईन्समध्ये काम करणारी वर्षा तुरकर (वय ३५) रा. खैरी, जि. बालाघाट हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा ठाण्याच्या हद्दीतील बोंडरानी (अर्जुनी) जंगल परिसरात १४ नोव्हेंबर रोजी घडली. वर्षा यांच्यासोबत असलेल्या नितेश अग्रवाल या युवकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार वर्षा तुरकर या दिवाळीनिमित्त मध्य प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी तालुक्यातील खैरी या तिच्या मूळ गावी आपल्या अडीच वर्षीय मुलीसोबत आली होती. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ती गोंदियातील तिच्या परिचयाच्या नितेश अग्रवाल याच्यासोबत वैनगंगा नदीच्या काठावर फिरायला गेली होती. सायंकाळी उशिरा तिच्या मित्राने वर्षाच्या कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता वर्षा रक्ताने माखलेली आढळून आली. तिला त्वरित खैरलांजीच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी तिला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मृत घोषित केले.

वर्षाच्या मित्राने कुटुंबीयांना सांगितले की घटनास्थळी काही बुरखाधाऱ्यांनी लूटपाट करून तिच्यावर हल्ला केला. मात्र, मित्राला कोणत्याही प्रकारे इजा झाली नाही. यामुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. पोलिस युवकाची चौकशी करत असून, या घटनेची सखोल तपासणी करत आहेत. घटनेची माहिती मिळताच खैरलांजी पोलिस, वाराशिवनी पोलिस ठाण्याचे प्रभारी अनूप उईके आणि कटंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास सिंह घटनास्थळी पोहोचले. वर्षाचा मृत्यू खैरलांजीमध्ये झाल्याने स्थानिक पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर महाराष्ट्र पोलिसांना तपासाची कागदपत्रे सुपूर्द केली जाणार आहेत. पुढील गोंदिया दवनीवाडा पोलिस करीत आहे.

दिवाळीसाठी आली होती माहेरी

वर्षाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार तिचे लग्न २०२४ मध्ये झाले होते. तिचा पती इंदूर येथे राहतो. त्यांना अडीच वर्षांची मुलगी आहे. वर्षा पुणे विमानतळावर इंडिगो कंपनीत नोकरी करीत होती. दिवाळी निमित्त ती आपल्या मुलीसह माहेरी आली होती. सध्या वर्षाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोस्टमॉर्टम अहवाल व पोलिस तपासानंतरच मृत्यूचे खरे कारण उघड होणार आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली.

Popular Articles