spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाऊबीजेला जाताना काळाचा घाला

– दुचाकी अपघातात ३ वर्षीय चिमुकली ठार

वर्धा :- देवळीवरून पुलगावमार्गे तळेगावला भाऊबीजेच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जाताना कुटुंबाचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ वर्षीय चिमुकली जागीच ठार झाली, तर आई, वडील गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी, १४ नोव्हेंबर रोजी दुपारी समृद्धी महामार्गालगतच्या ठाणेगाव परिसरात घडली.

देवळी येथून तळेगाव येथे जातांना घडली घटना

अनन्या नरेश आहके असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तिचे वडील नरेश आहके (३६) आणि आई मीरा आहके (३४) अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मुलगा रुद्रेश आहके (५) हा मात्र सुदैवाने सुखरूप आहे. हे चौघेही दुचाकीने देवळी येथून तळेगाव येथे भाऊबीजेच्या कार्यक्रमासाठी जात होते.

सुदैवाने भाऊ बचावला

समृद्धी महामार्गालगतच्या ठाणेगाव परिसरात दुचाकी चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्यालगतच्या कठड्यावर जोरात धडकली. या धडकेत आईजवळ असलेली अनन्या खाली पडून तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यात तिचा मृत्यू झाला. या अपघातात नरेश आहके व मीरा आहके हे दोघेही गंभीर जखमी झाले. ५ वर्षीय रुद्रेश मात्र सुदैवाने सुखरूप बचावला आहे.

वर्धा येथील रुग्णालयात दाखल

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने पुलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना वर्धा येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी पुलगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Popular Articles