spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बुधवारला बेल्यात शाही संदल

– बाबा जलाली सरकार दरबारात वार्षिक उर्स

बेला :- जवळच्या मेनखात(रिठी) येथे बाबा जलाली सरकारचे वतीने यंदाही वार्षिक ऊर्स उत्साहात साजरा करण्यात येत आहे.येत्या(१८ नोव्हेंबर)बुधवारला सायंकाळी ५ वा. बेला नगरीत शाही संदल निघणार आहे. त्यामध्ये नागरिक व भाविकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गुरुवारला सायंकाळी आयोजित भव्य महाप्रसादाचा असंख्य भक्तगण लाभ घेतील. महाप्रसादाला आलेले पंचक्रोशीतील सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिकांसह असंख्य भक्तगण बाबांच्या मदारीचे आवर्जून दर्शन घेतात.रात्रीला नागपूर येथील अंगेश्वर विंचुरकर ग्रुप रसिकांपुढे कव्वाली प्रस्तुत करतील. गुलाबी थंडीतही प्रेक्षक,श्रोते उपस्थित राहून कव्वालीस दाद देतात. ओम श्री बाबा जलाली सरकार दरबार सेवा मंडळ व पहेलवान बाबा दरबार सेवा ट्रस्टच्या वतीने सदर वार्षिक उर्सचे आयोजन करण्यात येते.

  सौंदर्यीकरण व्हावे

गावाबाहेरून वाहणाऱ्या वेना नदीत मौजा मेनखात शिवारात कधीही न आटणारा विशाल डोह आहे.त्याचे थडीवर जलाली बाबांची पुरातन मदार आहे. ती पवित्र, पावन आहे.अशी आख्यायिका आहे.पठारी परिसर सभोवती उंच सखल टेकड्या व झाडी,झुडपे,वनराई आहे. हे ठिकाण मनमोहक वाटत असल्याने सौंदर्यीकरण होणे गरजेचे आहे.

Popular Articles