नागपूर :- दिवाळीच्या सुट्टीत नातेवाईकांकडे मुक्कामासाठी आले असताना देरडा येथील, शेतातील मोकळ्या मैदानावर क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. ग्रामीण भागातील निसर्गरम्य वातावरणात क्रिकेट खेळताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आज क्रिकेट हा खेळ किती लोकप्रिय झाला आहे, याची प्रचिती अशा छोट्या गावांतील मैदानांवरही पाहायला मिळते. शहर असो वा गाव, क्रिकेटची क्रेझ मात्र सर्वत्र सारखीच असल्याचे या क्षणातून दिसून आले. देरडा गावातील डॉक्टर मुरतकर परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या नातेवाईकांनी क्रिकेटच्या मैदानावर आपापल्या खेळाची चुणूक दाखवली. कुणी फलंदाजीचा आनंद घेतला, तर कुणी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची जबाबदारी सांभाळली. चौकार- षटकारांची आतषबाजी, चेंडू पकडण्यासाठी होणारी धावपळ, खेळाडूंना प्रोत्साहन देणारे आवाज आणि प्रत्येक धावेवर व्यक्त होणारा जल्लोष यामुळे संपूर्ण मैदान उत्साहाने भारावून गेले होते. देरडा येथील मुरतकर परिवारातर्फे आयोजित कार्यक्रम करण्यात आला होता. खऱ्या अर्थाने, शहरातील मोठ्या क्रीडांगणांची गरज नसते; खेळाची आवड, एकत्र येण्याची भावना आणि आनंद लुटण्याची तयारी असेल, तर शेतातील मोकळे मैदानही क्रिकेटचे सुंदर मैदान बनू शकते, याचा प्रत्यय देरडा येथे आला.
Latest News
Related Posts
दिवाळीच्या सुट्टीत शेताच्या मैदानावर रंगला क्रिकेटचा आनंद!






