नागपूर १८ : राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियोजन भवनात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात समाजातील विविध घटकांचे प्रश्न ऐकून घेतले आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली.
या कार्यक्रमात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यांतील नागरिकांनी उपस्थित राहून आपले प्रश्न, अडचणी व मागण्या मंत्री बावनकुळे यांच्यासमोर मांडल्या. कार्यक्रमादरम्यान २८० लेखी विनंत्या स्वीकारण्यात आल्या. अनेक नागरिकांनी वैयक्तिकरित्या भेट घेऊन संवाद साधला. महसूल मंत्री बावनकुळे यांनी वृद्ध, महिला, विद्यार्थी, अपंग, तसेच तृतीयपंथीयांसारख्या सर्व समाजघटकांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. त्यांच्याकडून प्राप्त निवेदने संबंधित विभागांकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कार्यक्रमात उपस्थित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सुचवले की, नागरिकांच्या तक्रारी व समस्या गांभीर्याने घेऊन तात्काळ कारवाई करावी. तसेच, मागील जनसंवाद कार्यक्रमात प्राप्त तक्रारींपैकी किती सोडवण्यात आल्या, याचा देखील आढावा घेण्यात आला. पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, “जनतेशी थेट संवाद हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. समस्यांचे निराकरण हेच आमचे ध्येय आहे.”या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वास निर्माण झाला असून, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची भावना अधिक बळकट झाली आहे.