spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई :- महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, ७ डिसेंबर ते शुक्रवार, १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. विधानभवन येथे आयोजित विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभू, अमीन पटेल, विधानपरिषद सदस्य अनिल परब, विक्रम काळे, सतेज पाटील, प्रवीण दरेकर आणि विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आगामी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीबाबत सविस्तर चर्चा करून ७ ते १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दोन आठवड्यांच्या विधिमंडळ कामकाजाच्या नियोजनाचा आढावा घेऊन त्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

Popular Articles