– जय जवान संघटनेतर्फे अर्धाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण
नागपूर :- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जय जवान संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज उद्यान परिसरात, बॉलीवूड सेंटर पॉइंटजवळ असलेल्या त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी इंदिरा गांधी यांच्या खंबीर नेतृत्वाचा, दूरदृष्टीचा तसेच देशाच्या राजकीय आणि सामाजिक विकासातील त्यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
या कार्यक्रमाला प्रवीण विग्रे आणि दिलीप राऊत यांची विशेष उपस्थिती होती. तसेच जय जवान संघटनेचे सदस्य नूपुर मते, आदित्य सोनवणे, प्रतीक तोटे, सोहम कारिया यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.






