– त्रिपुर पौर्णिमेला महाप्रसादाने समाप्ती
बेला :- सूर्योदयापूर्वी स्नान करून केल्या जाणारी पहाटेची काकड आरती मन प्रसन्न करते.अध्यात्मिक क्षेत्रातील ग्रामीण भक्त त्यात आवर्जून सहभागी होत मनोभावे देवाचे नामस्मरण करत असल्याचे चित्र बेला येथे दिसून येत आहे. माळीपुऱ्यातील संत केजाजी महाराज मंडळ गेल्या १०० वर्षांपासून अखंड परंपरा जोपासून काकड आरती उत्साहात साजरी करीत आहे.येत्या २४ नोव्हेंबर,त्रिपुर पौर्णिमेला महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोजागिरी पौर्णिमेला संत केजाजी महाराज मंदिरात काकड आरतीचा पहाटे शुभारंभ झाला.वसंतराव कळसकर,सुभाष कावळे,शरद पावसे,चिंधू भोकरे, यादवराव भनारकर,रवी भोकरे,अनुसया कावळे,हिरा गवळी,रेखा गवळी,सुनीता कावळे,माया कावळे,पूजा फरकाडे, मीरा पावसे, भास्कर पडवेकर, मुक्ता तलवारे, दुर्गा भोकरे, मोतीराम कडू, मंथन लांडे,शेषराव कावळे व देवस्थान परिसरातील असंख्य भाविक नित्य नियमित सहभाग घेत आहे. येत्या त्रिपुर पौर्णिमेला गोपालकाला व महाप्रसादाने या मंगलपर्वाची थाटात सांगता होईल. त्यावेळी खऱ्या अर्थाने भावभक्तीचे दर्शन होईल.






