spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे प्रतिपादन

– आर्णी येथे आदिवासी लाभार्थ्यांचा मेळावा व आरोग्य शिबीर उत्साहात

यवतमाळ :- आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी आज आर्णी येथील कार्यक्रमात केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसद यांच्या वतीने आर्णी येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह येथे आयोजित आदिवासी लाभार्थ्यांचा मेळावा व आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे, पुसदचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, तहसिलदार, गटविकास अधिकारी व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी आदिवासी समाजासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने आदिवासी समाजासाठी विशेष पॅकेज देण्याचे काम केले. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी समाजाची संस्कृती, परंपरा जपण्याचे काम केले. आदिवासी विकास विभागाचं काम सुपरफास्ट चालु आहे. येत्या काळात समाजात आनंद आणि समृद्धी नक्कीच येईल. यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी समाज आहे. जनजातीय गौरव सेवा सप्ताहासह विविध उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजासोबत एकरुप होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे पालकमंत्री ना. राठोड यावेळी सांगितले.

यासह पालकमंत्र्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या योगदानाची माहिती दिली. सोबतच, शासकीय योजनांची माहिती देवून लाभ घेण्याचे आवाहन केले. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून समाजाच्या कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वनपट्ट्यांच्या सिमांकनासाठी विशेष मोहीमेचे निर्देश

कार्यक्रमादरम्यान वनपट्टे धारकांनी सिमांकन करुन देण्याची मागणी केली होती त्यांची दखल घेत वनपट्ट्यांचे सिमांकन करण्यासाठी विशेष मोहीम घेण्याच्या निर्देश पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी यावेळी दिले.

आदिवासी जनजातीय समाजाचा इतिहास जीवंत राहिला पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या जनजातीय गौरव सेवा सप्ताहात आदिवासी जनजाती समाजाचा पहिल्यांदाच सन्मान होत आहे. आदिवासी जनजातीय समाजाचा इतिहास जीवंत राहिला पाहिजे, ती गरज आहे. इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. आदिवासी समाजाला सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. जनजाती संस्कृती जीवंत राहिली पाहिजे. पारधी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील, पारधी समाजाला जाती प्रमाणपत्र, वेगवेगळे प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने शिबिर आयोजित करावे. विशेष लक्ष द्यावे. एकही पारधी बांधव शासकीय योजना, प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही यांची दक्षता घ्यावी. आदिवासी जनजाती समाजाच्या विकासासाठी शासन आणि प्रशासनाने संकल्प करावा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करु, आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि मानसिकता बदलविण्याची गरज असल्याचे सांगत शासनाच्या निर्णयांची माहिती दिली. तसेच आदिवासी जनजातीय समाजातील शेवटचा घटक केंद्रबिंदू मानून काम सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जनजातीय गौरव दिवसाबद्दल अपप्रचाराला बळी पडू नका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा जयंती दिन १५ नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिवस जाहीर केला. हा आनंदोत्सव आहे. समाजाचा सन्मान झाला पाहिजे यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे. जनजातीय गौरव दिवसाबद्दल अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहनही डॅा. उईके यांनी यावेळी केले.

पारधी समाजासाठी शिबीर आयोजित करा- आ. राजू तोडसाम

आदिवासी समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या पारधी समाजाच्या नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्र मिळावे यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याच्या सूचना आर्णी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू तोडसाम यांनी यावेळी केली.

यावेळी पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त झालेल्या शिक्षकांना नियुक्ती आदेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्साहात करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते फित कापून प्रवेश करण्यात आला.

तसेच राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत आदिवासी महिला बचत गटांना लाभाचे वितरण करण्यात आले. मिशन उभारी अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना अर्थसहाय्य, पीएम जनमन योजनेचा लाभ, पारधी पॅकेज अंतर्गत पारधी महिला बचत गटांना विविध योजनेच्या लाभाचे धनादेश मानेयवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुसदचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी केले.

Popular Articles