किशोर साहू,मौदा :- ग्रा पं तुमान येथे मंगळवार (ता. १७ नोव्हेंबर)ला आयोजित मंडई कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच धम्मजीत गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले व यानिमित्त आयोजित सांस्कृतिक लावणीचा कार्यक्रम सादर करणाऱ्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी निधी पुणेकर यांच्या सरपंच गजभिये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडई निमित्त तुमान गावाला जत्रेचे स्वरूप आलेले होते.
याप्रसंगी माजी आमदार मालिकार्जून रेड्डी ,माजी जि प सदस्य कैलास बरबटे, सरपंच धम्मजीत गजभिये,प्रल्हाद रंधई, पुरुषोत्तम राऊत, दुर्गेश घोडमारे , प्रमोद बरबटे विकास चौधरी, दिपक गायकवाड, मनोहर चौधरी, शरनाथ सोनवाने ,शुभम पटिये,भुषण रंधई,सचिन गजबे, प्रज्वल शिंगने,नितीन चौधरी, आशीष चौधरी,रवि भिवगडे, प्रशांत चौधरी,अमीत शेरकूरे,रितेश चौधरी, कार्तिक घोडमारे,वैभव घोडमारे,सूमीत कुंभरे,अतूल भोयर,सौरभ राऊत, अनिकेत चौधरी ,विपुल रंधई सह गावातील परिसरातील तालुक्यातील व जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





