spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दुष्काळग्रस्त ४२ लाख शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य

– प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा पाच किलो धान्य

मुंबई :- राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता राज्यातील उर्वरित ३३ जिल्ह्यांतील सुमारे ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा पाच किलो याप्रमाणे धान्य वितरित करण्यात येईल.

सध्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील ५ कोटी ७९ लाख ३४ हजार ७०२ लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य दिले जाते. तसेच आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील २१ लाख ६० हजार ६८२ शेतकऱ्यांना दरमहा १७० रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या दोन्ही योजनांचा लाभ मिळत नसलेल्या शेतकरी कुटुंबांनाही दुष्काळाच्या काळात अन्नधान्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या योजनेनुसार पात्र शेतकरी कुटुंबांना दरमहा प्रति व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे एकूण पाच किलो धान्य तीन महिन्यांसाठी मोफत मिळणार आहे. अन्नधान्याचा लाभ किंवा एपीएल-डीबीटी योजनेंतर्गत आर्थिक मदत न मिळणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

बायोमेट्रिक पडताळणीनंतरच धान्यवाटप

लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांचे आधार सीडिंग पूर्ण असल्यास ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य वितरित केले जाईल. ज्या लाभार्थ्यांचे आधार सीडिंग अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच बायोमेट्रिक पडताळणीद्वारे धान्याचा लाभ देण्यात येणार आहे.

Popular Articles