कन्हान १९ : – परिसरातील शाळा, महाविद्यालय, शास किय कार्यालय, राजकिय, सामाजिक व सेवाभावी संस्थे व्दारे विविध कार्यक्रमासह झेंडावंदन करून ७९ वा स्वातंत्र दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
आदर्श हायस्कुल व आयडियल कॉंन्व्हेट कन्हान
आयडियल एज्युकेशन सोसायटी कन्हान व्दारे संचलित आदर्श हायस्कुल कन्हान व आयडियल कॉन्व्हेंट हिंदी प्राथमिक शाळेत ७९ वा स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा सौ. पुष्पा द्विवेदी यांच्या प्रमुख उपस्थित व सचिव भरत सावळे यांच्या अध्यक्षेत भारत माता आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीतांच्या गायनातुन रंगारंग कार्यक्रम सादर केले. या वेळी संस्थेचे सचिव भरत सावळे यांनी पालकांच्या स्मरणार्थ “श्यामली पुरस्कार” च्या माध्यमातुन इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या ५१ मुलांना रोख रक्कम देऊन गौरन्वित केले. आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक गिरीजाशंकर यादव यांनी प्रास्ताविकातुन विद्यार्थ्याना स्वातंत्र्य लढ्याबद्दल मार्गदर्शन केले. ज्येष्ठ शिक्षक सोलंकी सर व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका लता पेटकर, संस्थेच्या सदस्या नीता मेश्राम, कु छाया मिसार आणि संस्थेचे सदस्य घवघवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. भरत सावळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना देशभक्तीची भावना बाळगण्याचे आवाहन केले. विद्यार्थांना मिठाई वितरित आणि राष्ट्रगीत गायन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मनोज डोंगरे यांनी तर आभार अलंकार राखडे यांनी मानले .कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
वराडा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा
ग्राम पंचायत वराडा येथे शुक्रवार (दि.१५) ऑगस्ट ला सर्व प्रथम सरपंच सुनिल जामदार यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि ध्वजारोहण करुन उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थांना छत्री आणि सर्पमित्रांना सर्प पकडण्यास सुरक्षा साहित्य किट वाटप करुन स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी उपसरपंच भोजराज काकडे, पोलीस पाटील संजय नेवारे, माजी उपसभाप ती देवाजी शेळकी, सर्पमित्र आशिष वरकडे, प्रणय लंगडे, रोशन जामदार, कृणाल देऊळकर, सतिश लंगडे सह ग्रामस्थ नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.
अखिल भारतीय मांग-गारूडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती
झेंडा चौक पवार हाउस जवळ विष्णुलक्ष्मी नगर तारसा रोड, कन्हान येथे अखिल भारतीय मांग-गारूडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती आणि एम.जी. एस. स्पोटींग शिक्षण संस्था, कन्हान यांच्या सयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष मा. नेवालाल पात्रे यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी माजी जि प सदस्य मा. अंबादास खंडारे यांच्या हस्ते महापुरूषाच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहन करून स्वातंत्र दिन सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी नेवालाल इंचुलकर, विक्रम पात्रे, दलजित पात्रे, प्राण नाडे, मंगलसिंग लोंढे, शेषराव नाडे, देवानंद पेटारे, अर्जुन पात्रे, शैलेश पात्रे, सागर पात्रे, विक्रम उमे, अंजली गायकवाड, विशाखा पात्रे, दिव्या पात्रे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी मा. अंबादास खंडारे, महेंद्र खडसे, रघुनाथ पात्रे हयानी मार्गदर्शन केले. तर नेवालाल पात्रे यानी अध्य क्षिय मार्गदर्शनात स्वातंत्र प्राप्ती करिता आपल्या समा जाचे सुध्दा महत्वाचे योगदान असुन स्वातंत्र्याच्या इति हासा विषयी संबोधित केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता भाटिया पात्रे, आशिष कांबळे, वीर गायकवाड, बादल लोंढे, अजित पात्रे, रोहित खडसे, सुमित पुरवले, सुधाकर पात्रे, सुनिल भिसे, शिवराज उफाडे, शंभु खंडारे, सरजु खडसे, गोलु पुरवले, अर्जुन गायकवाड, रंजित खडसे, नाना पात्रे, राहुल गायकवाड, किशोर शेंडे, इन्दार पात्रे, नेवालाल खडसे, सुरेन्द्र शेन्डे, किम्मत पात्रे, रामनाथ लोंढे, जोगेदर पुरवले, जगलु हातागडे, रवि रोकडे, विजय गायकवाड, अनेश गायकवाड, जश वंत पुरवले, विजय शेन्डे, लखन पात्रे, जगीरा कामडे, सन्नी ठुनाडे, अजय इंचुलकर, सावन रोकडे, मेहेर इंचुरकर, सावन लोंढे, बलदेव नाडे, राजन पात्रे, शेखर पेठारे, अरविंद इंदुरकर, किरन पेठारे, रामाजी पात्रे, कोहिनुर हातागडे, सुधाकर भालेकर, अरविंद पात्रे, सतिश नाडे, विष्णुदास शेन्डे, रवि खडसे, लालचंद पात्रे, रविन्द्र लोंढे, भारत पात्रे, गौतम इंदुरकर आदीनी उपस्थित राहुन सहकार्य केले.
जुनीकामठी येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिवस उत्साहाने साजरा
विदर्भ ढिवर समाज विकास संघ, जुनीकामठी व्दारे समाज भवनाच्या पटांगनावर ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जि प शाळे चे मुख्याध्यापक पाटील सर यांच्या हस्ते व जुनी कामठी ग्राम पंचायत सरपंच, सचिव व पदाधिका री यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करुन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर उके, तुळशीराम बावणे , राजु मेश्राम, विठ्ठल उके, शिवा बावणे, गरिबा भोयर, विनायक उके, वैभव केवट, कैलास वरले, भीमराव वाघधरे सह गावकारी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.







