spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रुग्णालय व शाळेकडे जाणारा मार्ग अवरुद्ध – टोपल्यांच्या दुकानामुळे नागरिक हैराण

सावनेर १९ : गडकरी चौक ते बाजार रोड मार्गावरील सेंट जॉन कॉन्व्हेंट शाळा व साई रुग्णालयाच्या वळणावर रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या टोपल्यांच्या दुकानामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी शाळेची बस, पालकांसोबत दुचाकीवरून जाणारे बाल विद्यार्थी तसेच उपचारासाठी येणारे रुग्ण यांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही सार्वजनिक रस्ता अडवून व्यवसाय करणाऱ्यांवर वारंवार कारवाई केल्यानंतरही हे दुकानदार पुन्हा त्याच ठिकाणी येऊन बसतात. शिवाय, त्यांनी रस्त्यावर बासाचे तुकडे व कचरा टाकल्याने परिसर अस्वच्छ होत असून पालिकेला झाडू मारताना त्रास होत आहे.

या ठिकाणी वाहतुकीचा मार्ग संकुचित झाल्याने भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिक, रुग्ण व शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी पालिका तसेच पोलीस प्रशासनाने तात्काळ हे टोपल्याचे दुकान हटवावे, अशी जोरदार मागणी केली आहे.

Popular Articles